साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत असतानाच दुचाकीसह उघड्या गटारात बुडाले; व्हिडीओ व्हायरल

पावसामुळे साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत आलेलं दांपत्य खड्ड्यात दुचाकी गेल्याने बुडाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिथे उपस्थित लोकांनी धाव घेतल्याने सुदैवाने दांपत्याचा जीव वाचला. पण त्यांची दुचाकी मात्र या गटारात वाहून गेली. उत्तर प्रदेशातील अलिगडमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी असणारी ही व्यक्ती आपल्या पत्नीसोबत अलिगडमधील रुग्णालयात चालली होती.

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार हे दांपत्य साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत येताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवणार इतक्यात त्यांची गाडी उघड्या गटारात जाते आणि दोघंही त्यात पडतात. यावेळी तेथील लोक दोघांना मदतीचा हात देत वाचवतात. पण त्यांची गाडी मात्र त्या गटारात वाहून जाते.

“आम्ही स्कूटवरुन रुग्णालयात चालला होतो. गटार उघडं होतं आणि पाणी साचल्यामुळे ते कळत नव्हतं. आम्हाला याची काही कल्पना नसल्याने स्कुटरसहित त्यात पडलो. आम्हाला काही जखमा झाल्या आहेत,” अशी माहिती पोलीस कर्मचारी दयानंद सिंग यांनी दिली आहे.

आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंग यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

“उत्तर प्रदेशातील स्मार्ट सिटी अलिगड. आम्ही कोणाचे आभार मानावेत?,” अशी उपहासात्मक विचारणा त्यांनी ट्विटमधून केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply