सांगली : गोपीचंद पडळकरांना धक्का! भावासह 100 जणांवर गुन्हा दाखल

सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात काल रात्री अंधारात जेसीबीच्या सहाय्याने दुकाने आणि हॉटेल पाडण्यात आली. या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मिरज शहरामध्ये मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. रात्रीच्या अंधारात ही कारवाई करण्यात आली. ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दरम्यान घटनेप्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान केलं. बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, लोकांना मारहाण करणे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. 12 कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यालगत असणाऱ्या दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती पाडण्यात आल्यात. जेसिबीने मिळकती पाडून हजार लोकांच्या सहाय्याने जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आले होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply