सर्वोच्च न्यायालयाचा ‘मोठा’ निर्णय; बाबरी विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित खटले बंद करणार

बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित खटले बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुजरात दंगलीशी संबंधित खटले निष्फळ ठरत असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. तसेच यापैकी बहुतांश प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. याशिवाय न्यायालयाने ६ डिसेंबर १९९२ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बाबरीचा ढाचा पाडण्याशी संबंधित अवमान याचिकाही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. २००२ च्या गुजरात दंगली प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाडच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोघांनीही माफी मागितली आहे. २००९ मध्ये एका मुलाखतीत प्रशांत भूषण यांनी माजी आणि विद्यमान न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे दोघांविरुद्धचा खटला बंद करण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने मान्य केली.

Follow us -

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply