“सत्यमेव जयते”, संजय राऊतांना जामीन मंजूर होताच सुनील राऊतांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडवण्यासाठी प्रयत्न करतील,”

कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत गेल्या १०० दिवसांपासून तुरुंगात होते. पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांना जामीन मंजूर करता ठाकरे गटात उत्सहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडीने अटक केली होती. तेव्हापासून संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात होता. त्याविरोधात संजय राऊतांनी अनेक वेळा जामिनासाठी अर्ज दाखल केलेला. त्यानंतर आज ( ९ नोव्हेंबर ) अखेर न्यायालयाने संजय राऊतांना दिलास देत जामीन मंजूर केला आहे. संजय राऊतांना जामीन मिळताच शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

“आमचा न्यायव्यस्थेवर पूर्ण विश्वास होता. महाराष्ट्रातील सर्व जनेतेचे आशीर्वाद संजय राऊत यांच्याबरोबर होते. न्यायव्यवस्थेने योग्य तो निर्णय संजय राऊतांच्या पारड्यात टाकला. साडेतीन महिन्यानंतर बाहेर संजय राऊत येतील. त्यानंतर शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडवण्यासाठी प्रयत्न करतील,” असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply