श्रीलंका संकटात ! नागरिकांना मिळेना पेट्रोल, कागद नसल्याने परीक्षा रद्द

कोलंबो : शेजारील देश श्रीलंकेत महागाई आणि आर्थिक संकटामुळे स्थिती चिंताजनक बनली आहे. एकीकडे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, तर दुसरीकडे अत्यावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना पळापळ करावी लागत आहे. गेल्या एका वर्षापासून भीषण संकटांशी सामना करत असलेल्या श्रीलंकेत आता परिस्थिती बिघडत चालली आहे. रविवारी पेट्रोलसाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. देशात इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे लोक अडचणीत सापडले आहेत. कोलंबोत पोलिसांचा प्रवक्ता नलिन थलदुवा म्हणाले, की दोन्ही मृत व्यक्तींचे वय ७० वर्षांच्या पुढे होते. वेगवेगळ्या ठिकाणांवर पेट्रोल आणि राॅकेलसाठी प्रतिक्षा करत होते. काही दीवस काही तासांसाठी पेट्रोलपंप खुली होतात आणि पेट्रोलसाठी लोक रांगा लावतात. या व्यतिरिक्त वीजपुरवठाही खंडित होत आहे. तासन् तास वीजपुरवठा खंडित असतो. अत्यावश्यक सेवांकरिताच वीजपुरवठा केला जातो. आगामी दिवसांत परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते. कारण देशातील एकमेव तेल शुद्धीकरण कारखान्याचे काम ठप्प झाले आहे. एवढेच नाही तर घरगुती गॅसचीही खूपच टंचाई आहे. १२ किलोच्या घरगुती गॅसच्या एक सिलिंडर श्रीलंकेत सध्या १ हजार ३५९ रुपयांपर्यंत मिळत आहे. भविष्यही अंधारात, कागद नसल्याने परीक्षा रद्द मोठ्या प्रमाणावर लोक आता राॅकेलवरच स्वयंपाक करण्यास मजबूर आहेत. मात्र राॅकेलही भल्या मोठ्या रांगेत उभे राहिल्यानंतरच मिळत आहे. देशातील संकटाचा परिणामही विद्यार्थ्यांवर झालेला दिसत आहे. देशात कागदाच्या कमरतेमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करावी लागली आहे. वास्तविक आपल्या गरजेनुसार श्रीलंक कागद आयात करतो. मात्र डाॅलरच्या कमतरतेमुळे ते आयात करता येईना. त्यामुळे एकच रस्ता उरला होता. तो म्हणजे परीक्षा रद्द करणे. शिक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे, की देशात सोमवारपासून शाळांमध्ये परीक्षा सुरु होणार होत्या. मात्र कागदाची कमतरता असल्याने अनिश्चित काळासाठी त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply