श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; गोळ्या झाडून मृतदेहावर पेट्रोल ओतले; नंतर २०० किमी दूरवरील जंगलात फेकले

श्रद्धा वालकरच्या हत्येने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. अशात याच दु:खातून देश सावरत नाही तोच अशीच आणखीन एक घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तिचे शव विद्रूप केले. त्याने पेट्रोल टाकून मृतदेह जंगलात फेकून दिला. रायपूर पासून २०० किलोमीटर दूर असलेल्या ओडिसा येथे त्याने प्रेयसीची हत्या केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

स्वत:च्या बचावासाठी तनू जिवंत असल्याचा दिला पूरावा सचिनने तनूवर गोळ्या झाडून तिची हत्या केली होती. तसेच तिचा फोन त्याने स्वत:कडे ठेवला आणि ओडिसा येथील जंगलात तिचा मृतदेह फेकून दिला. तिचे शव सापडल्यावर त्याची ओळख पटूनये यासाठी त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकले होते. तसेच तनूच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी त्याने तिच्या फोनवरून आपण लवकरच लग्न करू, असा मॅसेच स्वत:ला केला आणि ती जिवंत असल्याचे तो वारंवार सांगत राहीला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *