‘शेर शिवराज’च्या शिरपेचात मोठा बहुमान; म्हणूनच ट्रेलरची रंगलीय चर्चा…

आज आपण तंत्रज्ञान क्रांतीच्या अशा उंबरठयावर आहोत की ज्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘मेटाव्हर्स’(Metaverse) नावाच्या संकल्पनेने आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका आभासी तंत्रज्ञानाद्वारे ओळख तयार करुन त्याद्वारे संवाद साधण्याचे माध्यम म्हणून मेटाव्हर्सकडे पाहिले जाते. वेब ३.० हे नव्याने आलेले इंटरनेटचे युग आहे. वेब ३.० मध्ये फाइव्ह जी, ब्लॉकचेन, ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटी, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे तंत्रज्ञानदेखील थेट मेटाव्हर्सशी निगडितच आहे. वेब ३.० मध्ये वापरकर्ते कोणत्याही मध्यस्थ व्यक्तीशिवाय विविध सोयी-सुविधांचा थेट लाभ घेऊ शकतात.

मनोरंजनाचा हा नवा ट्रेण्ड प्रत्येकालाच आकर्षित करतो आहे. अशाप्रकारे हे नवे तंत्रज्ञान मानवी आयुष्याशी संबंधित सर्व क्षेत्रांना व्यापून उरणार आहे. आगामी ‘शेर शिवराज’(Sher Shivraj) या ऐतिहसिक मराठी चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सच्या माध्यमातून दाखविला गेला. मेटाव्हर्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखविण्यात आलेला हा पहिलाच मराठी चित्रपटाचा ट्रेलर आहे. मुंबई मुवी स्टूडियोज आणि यूएफओ मुव्हीज यांनी ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाकरिता मेटावूडसोबत भागीदारी केली आहे. तंत्रज्ञानाशी सांगड घालत आपला दैदिप्यमान इतिहास भविष्यातील पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *