मुंबई: शिवसेना खरी कोणाची? निवडणूक आयोग करणार फैसला; दोन्ही गटांना दिले आदेश

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. भाजपसोबत जात शिंदे गटाने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण शिवसेनेने शिंदे गटावर कारवाई करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. आता शिवसेना कोणाची या संदर्भात ८ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शिंदे गट आणि शिवसेनेकडून ८ ऑगस्ट रोजी १ वाजेपर्यंत लेखी पुरावे देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुळ शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार याचा निकाल ८ ऑगस्ट रोजी समोर येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत फूट सुरू आहे. ४० आमदारांपाठोपाठ आता १२ खासदारांनी बंड केले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर राज्यातील पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शिंदे गट धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगू शकते असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमिवर आता निवडणूक आयोगाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नेमकी शिवसेना कोणाची याचा फैसला ८ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे बोलले जात आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. बंड केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे सभा घेत आहेत. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यभरातील जिल्हा प्रमुखांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांची तयारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply