“शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदे यांना न कळत एक पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला होता. त्यावरून आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांना सवाल केला होता. आता यावर शरद पोंक्षेंने सडेतोड उत्तर दिले आहे.

शरद पोंक्षेंनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शरद पोंक्षेंनी त्यांच्या पुस्तकातील पानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्या पानावर शरद यांनी त्यांच्या कर्करोगाविषयी सांगितले. कशा प्रकारे सगळ्यात आधी त्यांना आदेश बांदेकर यांची आठवण आली आणि ते त्यांच्यासाठी कसे धावून आले. यावेळी आदेश बांदेकर यांची स्तूती करताना शरद म्हणाले, “असा हा आदेश, सहृदयी माणूस!” ही पोस्ट शेअर करत “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. यासोबतच त्यांनी आदेश बांदेकर यांना टॅगही केले आहे. शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

काय म्हणाले होते आदेश बांदेकर?

आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शरद पोंझेंनी दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पोंक्षेंनी २०१९ साली लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कर्करोगाच्या लढ्याविषयी सांगितले होते. या व्हिडीओ शरद पोंक्षें म्हणाले, “सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. आदेश म्हणाला कसली काळजी करू नकोस, मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता आहे असे ते सांगत आहेत. तर काय करू मला आता कळत नाही आहे. आदेश बांदेकर म्हणाले, काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली. तर अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठकरेंंना कळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.” हा व्हिडीओ शेअर करत “हा शरद पोंक्षे तूच ना ?” असा सवाल आदेश बांदेकर यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply