राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना बारामतीवरून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना सर्दी, खोकला आणि तापेचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांच्या बारामतीमधील निवासस्थानी सकाळी डॉक्टराच्या पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्रास वाढल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांचं पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं, त्यांची तपासणी केली आणि त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत डॉ. अभिजित लोढा यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले डॉ. लोढा?
शरद पवार यांच्या छातीमध्ये कफ झालेला आहे, छातीमध्ये थोडसं कजेक्शन आहे. योग्य त्या तपासण्या करण्यात येणार आहेत, आता सध्या शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत, सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थीर आहे. तपासण्यांचा रिपोर्ट आल्यानंतर जर उपचारामध्ये काही बदल करायचा असेल तर तसा बदल करू, त्यांना दोन – तीन दिवसांपासून खोकल्याचा त्रास आहे. पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये रिपोर्ट मिळेल, असं लोढा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना रुग्णालयात न येण्याचं आवाहन केलं आहे. ‘मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, की आपण हॉस्पिटलला आजिबात येऊ नका, इथे सर्व पेशंट आहेत, आणि आता डॉक्टरांनी जसं सांगितलं शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. मी स्वत: चर्चा केली आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याच कारण नाहीये. गेल्या दहा -बारा दिवसांपासून असलेला ताण, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की गेल्या दहा -बारा दिवसांपासून पवार साहेब अनेकांना भेटत होते, त्यामुळे थोडासा ताण आला आहे. छातीमध्ये थोडासा कफ झाला आहे, आता थोड्यावेळात रिपोर्ट येतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

