“वेडात मराठे वीर दौडले चाळीस”; राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मिश्कील टिप्पणी

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसून आले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ‘वेडात वीर मराठे दौडले चाळीस’, अशी मिश्लील टीप्पणी केली. यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीवरून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख “वेडात वीर मराठे दौडले चाळीसचे निर्माते, दिग्दर्शक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”, असा केला. त्यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. पुढे बोलताना त्यांनी महेश मांजरेकर यांचे कौतुकही केले. “कोणी वेड्याने धावणारा असेल तर ते महेश मांजरेकर आहेत. प्रत्येकवेळी ते नवं आणि भव्य स्वप्न घेऊन येतात. ‘वेडात वीर मराठे दौडले सात’ या चित्रपटाबाबत मला महेश मांजरेकरांनी पाच वर्षांपूर्वी माहिती दिली होती. आज मराठीतला सर्वात मोठा चित्रपट तुमच्यापुढे येत आहे. आज मराठी चित्रपटसृष्टी पुढे जाते आहे. त्याचं मोठं क्षेत्र, महेश मांजरेकरांना जाते”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

आज मराठी चित्रपटसृष्टीत ज्या मोजक्या लोकांना मराठी चित्रपट समजतो, त्यापैकी महेश मांजरेकर एक आहेत. त्यामुळे हा चित्रपट भव्य असेल, यात कोणतीही शंका नाही, असेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply