विश्वास नांगरे पाटील , अशुतोष कुंभकोणी वळसे पाटलांच्या बंगल्यावर… घडामोडींना वेग!

एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्त यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती झाली. यासोबतच कायदेशीर बाबींमध्ये न्यायालयात मुद्दे स्पष्ट करण्यासाठी वळसे पाटील यांच्या भेटीला राज्याचे महाधिवक्ता अशुतोष कुंभकोणी पोहोचले आहेत.  

सह पोलीसआयुक्त विश्वास नांगरे पाटील ,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीसाठी बंगल्यावर दाखल झाले आहेत. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष सरकारी वकील प्रदीप घरतही तातडीने वळसे पाटील यांच्या भेटीस पोहोचले आहेत.

पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वतीने सर्वात आधी उच्च पदावरील व्यक्ती पोहोचली ते म्हणजे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील. त्यांनी पोलीस बंदोबस्त लाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातील एफआयर दाखल करण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

त्यामुळे नांगरे हे देखील खलबतांसाठी उपस्थित आहेत. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर कोर्टात पुन्हा सदावर्तेंची सुनावणी पार पडणार आहे. राज्य सरकारने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र सदावर्तेंच्या वकिलांनी युक्तीवाद केल्याने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. ही वाढवून मागण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रयत्न होणार असल्याचं समोर येतंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply