वाघोली : नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची विक्री; अन्न आणि ओैषध विभागाची वाघोलीत कारवाई

वाघोली : झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (प्रिस्किप्शन) झोपेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न आणि ओैषध प्रशासनाने (एफडीए) वाघोलीत कारवाई करून एका ओैषध विक्री दुकानातून सहा हजार गोळ्या जप्त केल्या असून ओैषध विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वाघोली येथील साई अरिहंत जेनरिकचे महावीर मनसुखलाल देसरडा (वय ३४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बीडमधील न्यू विहान मेडिकलच्या नावे बनावट बिले तयार केली –

वाघोली येथील साई अरिहंत जेनरीक दुकानात सावंत यांनी तपासणी केली. त्यांना अल्प्रेक्स या औषधाच्या ६ हजार गोळ्यांची अज्ञातांना वाढीव दराने विक्री केल्याचे आढळून आले. बीडमधील न्यू विहान मेडिकलच्या नावे बनावट बिले तयार केली. शासकीय अधिकाऱ्यास बिलाची खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक करुन दिशाभूल केल्याचे सावंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

झोपेच्या गोळ्यांच्या वापरामागची कारणे –

अल्प्रेक्स या गोळ्या स्वस्त असून त्या प्रामुख्याने मानसिक विकार, चिंतेने ग्रासलेल्यांना डॉक्टरांकडून दिल्या जातात. या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असून बेकायदा जादा दराने या गोळ्यांची विक्री केली जात आहे. या गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने केला जातो. शस्त्रक्रियेनंतर झोप येत नसेल तर या गोळ्या दिल्या जातात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply