वकील गुणरत्न सदावर्तेंना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

सातारा : मराठा आरक्षण  प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपात गुरुवारी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते  यांना आज (शुक्रवार) सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दाेन्ही बाजूने जाेरदार युक्तीवाद झाला. न्यायाधिश श्री. शेंडगे यांनी सदावर्तेंना १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आज सकाळी सव्वा अकरा वाजता सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश श्री. शेंडगे यांच्या समाेर गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले हाेते.

खासदार उदयनराजे भाेसलेआणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत अपशब्द वापरुन सदावर्ते यांनी टीका केली हाेती. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधाने केली हाेती. मराठा आरक्षणालाही त्यांचा विराेध हाेता. सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याने स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी त्यांच्या विराेधात सन २०२० मध्ये सातारा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्या प्रकरणी त्यांना गुरुवारी सातारा पाेलिसांनी ताब्यात घेतलं हाेते. आज त्यांना न्यायालयात हजर केले हाेते.

दाेन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायाधिश शेंडगे यांनी सदावर्ते यांना तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply