लखनऊ : योगींची पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा, मोफत रेशन योजनेचा कालावधी वाढवला.

लखनऊ : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोफत रेशन योजनेची मुदत 3 महिन्यांसाठी वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे. यूपीच्या 15 कोटी लोकांसाठी मोफत अन्न योजना तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही योजना मार्च 2022 पर्यंत होती. दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही योजना महिन्यांसाठी वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

गरीबांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयानंतर यूपीमध्ये नागरिकांना तीन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे, अशी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ब्रजेश पाठक मागील सरकारमध्ये कायदा मंत्री होते. मात्र यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply