राष्ट्रवादी म्हणजे बांधलेली मोळी, तिची रस्सी म्हणजे शरद पवार – राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात 'उत्तर सभा' पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी आपल्यावर झालेल्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे म्हणाले, माझ्यावर भूमिका बदलण्याचे आरोप केले जातात. मात्र, १९९९ साली परदेशी व्यक्ती पंतप्रधान पदी नको म्हणत शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडलॆ. मात्र, त्यानंतर दोनच महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसशी मंत्रिपदासाठी हात मिळवणी केली.

उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीतील अनके प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका केली. ईडीच्या नोटीसीनंतर राज ठाकरेंनी भूमिका बदलली असल्याचे आरोप होत आहेत. मात्र, शरद पवार यांनीच वेळोवेळी भूमिका बदलल्याची टीका राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

एकाच घरात राहून अजित पवारांवर आयटीची धाड पडते, नोटीस येते. मात्र सुप्रिया सुळेंना नोटीस येत नाही. यामागील कारण काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही जोरदार टीका केली.

जे लोक मनसे म्हणजे संपलेला पक्ष आहे अशी टीका करतात त्यांनी हि सभा आणि सभेला जमलेली गर्दी पाहावी असे आवाहन करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह नेते जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांचा राज ठाकरेंनी भाषणातून जोरदार समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हि नेत्यांची बांधलेली मोळी असून या मोळीची रस्सी म्हणजेच शरद पवार असल्याची बोचरी टीका राज ठाकरेंनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply