राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या; जळगावात दोन जणांची आत्महत्या

राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कंटाळून आत्महत्या केली. अशातच जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे दोन्ही शेतकरी जळगावच्या धरणगाव तालुक्यातील रहिवासी असून सलग दोन दिवस दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. या घटनेने जळगाव जिल्हा हादरलाय.

कर्जाला कंटाळून या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे दोन्ही शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ऋषिकेश गुलाबराव पाटील आणि बापू तुळशीराम कोळी अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत. ऋषिकेश गुलाबराव पाटील हे शेरी गावचे रहिवासी असून ते अवघे २६ वर्षांचे होते. तर बापू तुळशीराम कोळी हे वंजारी खापट गावचे रहिवासी असून ते 53 वर्षांचे होते.

ऋषिकेश पाटील यांनी शनिवारी दुपारी शेतात विष प्राशन करत आत्महत्या केली त्यानंतर त्याला रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृषीकेश पाटीलला वृध्द आई आणि वडिल असे कुटूंब आहे.

बापू तुळशीराम कोळी हे आजारपणामुळे त्रस्त झाले होते. सोबत कर्जबाजारीही होते. त्यांना प्रकृतीवर उपचार घ्यायचे की कर्ज फेडायचे, हा मोठा प्रश्न होता. परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि इतर योजना राबवल्यानंतरदेखील शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये आत्महत्यांच्या घटना वाढलेल्या दिसून आल्या. शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य खचले असून त्यामुळे आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना महाराष्ट शासनातर्फे एक लाख रुपयांची मदत दिली जाते. ही मदतदेखील सरासरी फक्त ५० टक्के शेतकरी कुटुंबांना दिली आहे; तर उर्वरित ५० टक्के कुटुंबे ही त्या मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाने १९ डिसेंबर २००५ मध्ये घातलेल्या जाचक नियम आणि अटी प्रमुख अडथळा ठरल्या आहेत. १५ वर्षांनंतरही या नियमांमध्ये शासनाने कोणताही बदल केलेला नसल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply