रांची: पैशांची ‘खाण’ सापडलेल्या IAS अधिकारी पूजा सिंघलना दुसऱ्यांदा मोठा दणका

रांची: मनरेगा आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मनी लाँड्रिुंग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना झारखंड सरकारनं मोठा दणका दिला आहे. सरकारनं त्यांना तात्काळ प्रभावाने सचिव पदावरून निलंबित केलं आहे. झारखंड सरकारच्या संबंधित विभागाकडून या कारवाईसंबंधी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात ईडीकडून पीएमएलए २००२ च्या कलम १९ अन्वये अटकेचा उल्लेखही अधिसूचनेत करण्यात आला आहे.

पूजा सिंघल यांच्याकडे उद्योग आणि खाण विभागाच्या सचिवपदासह जेएसएमडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होत्या. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केल्यानंतर आता सरकारनेही त्यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. संबंधित विभागाने याबाबतची अधिसूचना काढली आहे.

पूजा सिंघल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर झारखंड सरकारनं तात्काळ त्यांना निलंबित केलं आहे. या प्रकरणात कारवाई करताना ईडीने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. यात १९ कोटींची रोकड सापडली होती. पूजा सिंघल यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. पूजा यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. मनरेगा, कोळसा ब्लॉक, खाण आदी विभागांत घोटाळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पूजा सिंघल आणि सुमन कुमार यांना १६ मे रोजी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

ईडीने पूजा सिंघल यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती बिघडली आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांच्यावर तुरुंगातील डॉक्टरांनी उपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईडीने पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे मारले होते. या कारवाईवेळी त्यांच्या सीए सुमन कुमार यांच्या घरातून १९ कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. याशिवाय, पूजा सिंघल आणि त्यांच्या पतीच्या हॉस्पिटलमधून महत्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply