रशियाने युक्रेनवर डागली सहा क्षेपणास्त्रे, स्फोटांमुळे नागरिकांची धावपळ

किव्ह : युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरुच आहेत. रशियन क्षेपणास्त्रांनी (मिसाईल) आज शुक्रवारी (ता.१८) युक्रेनला पुन्हा एकदा लक्ष्य केले. लिव्ह येथील एका लष्करी विमान कारखान्यावर एका पाठोपाठ सहा क्षेपणास्त्रे डागली. यात मात्र जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. दुसरीकडे एक बस कारखानाही नष्ट झाला आहे. ह्युमन काॅरिडोरवर बनली सहमती युक्रेनियन हवाई दलाच्या पश्चिमी कमांडनुसार हे क्षेपणास्त्रे काळ्या समुद्रातून डागली गेली. घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शी शिपाईने सांगितले, की सकाळी जवळपास सहा वाजता एकानंतर एक स्फोटांचे तीन आवाज ऐकले. घटनास्थळाजवळ राहणारा एक नागरिक म्हणाला, की त्याची इमारत हादरली आणि लोकांमध्ये गोंधळ पाहायला दिसला. (Russia Ukraine Crisis Russia Fired 6 Missiles On Ukraine) दुसरीकडे युक्रेन आणि रशिया आज ९ ह्युमन काॅरिडोरवर सहमत झाले. हे काॅरिडोर मारियुपोल, सुमी, ट्राॅस्ट्यानेट्स, लेबेडिन, कोनोटोप, क्रान्सोपिल्या येथील वसाहती आणि व्हेलेका पायसारिवका येथे होऊ शकते. युक्रेनमध्ये बालाक्लेया आणि इजियम, खार्किव्ह, ओब्लास्टला मानवी सहायता देण्याचे नियोजन केले जात आहे. दुसरीकडे जगातील वेगवेगळ्या देशांचे रशियावरील निर्बंध सुरुच आहेत. शुक्रवारी यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपान आदी देशांचा समावेश झाला. ऑस्ट्रेलियाने ११ रशियन बँका आणि सरकारी एजन्सीज् वर बंदी घातली. न्यूझीलंडने ३०० पेक्षा अधिक रशिय नागरिकांना प्रवेश देण्यास मना केली. जपानने रशियाच्या नऊ कंपन्या आणि १५ लोकांविरुद्ध नवे प्रतिबंध लागू केले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply