यवतमाळ : रुग्णाचा डॉक्टरवर चाकूहल्ला; डॉक्टरांमध्ये संताप, संपाचा इशारा

यवतमाळमध्ये एका रुग्णाने डॉक्टरवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे संतापलेल्या डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे.या हल्ल्यामध्ये हा निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या गालाच्या खालच्या बाजूला जखम झाली असून बराच रक्तस्राव झाला आहे. वारंवार रुग्णांकडून असे हल्ले होत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. राज्यातल्या डॉक्टरांनी आता संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे.

रुग्णांकडून डॉक्टरांवर असे हल्ले वारंवार होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसंच अनेकदा तक्रार करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील सगळे निवासी डॉक्टर हाताला काळी फीत बंधून काम करणार आहेत



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *