म्हाडा : पुणेकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या ५२११ घरासाठीची सोडत जाहीर

पुणे: पुणे विभागाच्या गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) घरांची सोडत आज पुण्यात पार पडली. पुणे जिल्ह्यातील म्हाडाच्या ५२११ घरासाठींची ही सोडत पुणे जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थित पार पडली.

म्हाडाकडे ५२११ घरासाठी सुमारे ७१ हजार ७७२ अर्ज आले होते त्यानुसार या घरांची सोडत अतिशय पारदर्शक रित्या पार पडल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सोडतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

आपले सरकार हे सर्वसामान्यांना न्याय देणार असून सरकार हे सर्वसामान्यांचा मनातल सरकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे. त्यासोबतच ५२११ लोकांना आज घरे मिळणार आहेत ही बाब खरच मोठी असून आपल्या म्हाडाच्या घरांसाठी एवढे अर्ज आल्याने जनतेचा शासनावर किती विश्वास आहे हे सिद्ध झालं' असल्याचं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात म्हाडाचा मोठा सहभाग आहे. राज्यात विविध गृह प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी गृहनिर्माण योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

दरम्यान, आजच्या या सोडतीची संपूर्ण यादी अर्जदारांना आज सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार असून ज्यांना घरी लागली आहेत त्यांना अधिकृत मेल पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply