बुशरा अन्सारी, इकबाल हुसैनImage Credit source: Instagram
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अंसारी यांनी वयाच्या 66 व्या वर्षी दुसरं लग्न करून सर्वांनाच चकीत केलं. बुशरा आता 69 वर्षांच्या आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये सासू किंवा आईच्या भूमिका साकारल्या आहेत. बुशरा या त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. परंतु वयाच्या 66 व्या वर्षी लग्न करून त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या होत्या. बुशरा यांचं पहिलं लग्न 1978 मध्ये झालं होतं. परंतु लग्नाच्या 36 वर्षांनंतर त्यांनी 2014 मध्ये पतीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी इकबाल हुसैन यांच्याशी दुसरं लग्न केलं. या वयात लग्न केल्यामुळे पाकिस्तानी मीडियामध्ये त्याची चांगलीच चर्चा होती.
बुशरा यांचे पती इकबाल हुसैनसुद्धा अभिनेते आहेत. तेसुद्धा घटस्फोटीत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इकबाल यांनी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीशी का लग्न केलं, यामागचं कारण सांगितलं आहे. इकबाल हुसैन यांनी पाकिस्तानच्या रमजान स्पेशल टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यात ते म्हणाले, “बुशराने मला एकदा म्हटलं होतं की लग्न करून टाक, कधीपर्यंत एकटाच राहशील. तेव्हा मी तिला म्हणालो की, तू सुद्धा एकटीच आहेस, तूच कर माझ्याशी लग्न. मला आयुष्यात कधीच माझ्या वयाच्या मुली आवडल्या नाहीत. मला नेहमीच माझ्यापेक्षा वयाने मोठ्या महिलाच आवडल्या आहेत. मी जेव्हा माझ्या मित्रांच्या घरी जायचो, तेव्हा त्यांना म्हणायचो की, तुमच्या बहिणींना बाजूला करा, पण आईंना माझ्यापासून धोका आहे. अर्थात मी मस्करी करतोय.”
इकबाल यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून अनेकांनी ट्रोल केलंय. आई किंवा बहिणींबद्दल अशा प्रकारची टिप्पणी केल्याप्रकरणी नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. बुशरा अन्सारी यांना जेव्हा दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा त्या म्हणाल्या, “माझ्या मनात तर दुसऱ्या लग्नाचा काहीच विचार नव्हता. घटस्फोटानंतर मी माझ्या आयुष्यात खुश होती. इकबालच्या घटस्फोटालाही 6 वर्षे झाली होती. तो एकटाच राहत होता. कामाच्या निमित्ताने आमच्यात संवाद सुरू झाला आणि मग मैत्री झाली. तो त्याच्या वयापेक्षाही अधिक समजूतदार आहे. त्यामुळे मी त्याच्याशी लग्नाचा निर्णय घेतला.”
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

