मोठी बातमी ! ठाकरे गटाला 'सर्वोच्च' संरक्षण; शिंदे गटाच्या वकिलानेच दिलं न्यायालयाला आश्वासन

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने याबाबत उत्तर मागवलं आहे. न्यायालयाने मुख्यमंत्री शिंदे आणि निवडणूक आयोगाकडे नोटिसीद्वारे उत्तर मागवलं आहे. आज सकाळी आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाल्यानंतर दुपारनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुनावणी सुरु झाली.

यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वपूर्ण युक्तीवाद केला. यावेळी सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आण चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तसेच आमच्या गटाला व्हिपापासून कोणतेही संरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे याला स्थगिती द्यायला हवी.

यावर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या वकिलांना विचारले की, या कालावधीत तुम्ही उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप जारी करणार आहात का? त्यावर शिंदे गटाच्या वकिलाने आम्ही व्हीप काढणार नसल्याचं म्हटलं. यावर न्यायालयाने म्हटलं की तुमचा युक्तीवाद मी रेकॉर्डवर घेतो. अर्थात हा ठाकरे गटाला मोठा दिलासा मानला जात आहे. तसेच त्यांना संरक्षणही मानले जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply