मोठी बातमी: उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई झाली असून ईडीने यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढले आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता १०.२० कोटींची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.

ईडीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. त्यामुळेच ईडीने मुरुड दापोली मधली 42 गुंठे जमीन आणि साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबर रोजीच ट्विट करत ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची यादी जाहीर केली होती. या नेत्यांवर नव्या वर्षात मोठी कारवाई होणार, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता अनिल परब यांच्यावर पहिली कारवाई झाली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply