मुलीला फोन केल्याच्या रागातून मुलांसह पालकांना ठेवले डांबून

पुणे - मुलीला सतत फोन करुन त्रास देत असल्याबद्दल दोन मुलांना बोलावून त्यांना मारहाण करुन डांबुन ठेवून त्यांचे १ लाख रुपयांचे मोबाईल काढून घेणाऱ्यावर कोंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा  दाखल केला आहे. ही घटना एनआयबीएम रोडवरील एका सोसायटीत २८ मार्च रोजी घडली आहे.

याप्रकरणी वानवडीत राहणार्‍या ५१ वर्षाच्या नागरिकाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा, फिर्यादींचा मित्र व त्यांचा मुलगा यांना एका कुटुंबाने घरी बोलावले. ते घरी गेल्यावर त्यांना तुमचा मुलगा माझ्या मुलीस सतत फोन करुन सतावत आहे, असे म्हणून फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करुन चप्पलने मारहाण केली. फिर्यादी व त्यांच्या मित्राचा १ लाख रुपयांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. तुमच्या मुलाने केलेल्या वर्तनाबाबत तुम्हाला भरपाई द्यावी लागेल व नाही दिल्यास बघून घेऊ, अशी धमकी दिली. त्यांना घरात ३ ते ४ तास डांबून ठेवले. या कुटुंबाने सातत्याने त्रास दिल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply