मुंबई : IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

 मुंबई पोलीस दलात विशेष आयुक्त हे ऐतिहासिक पद तयार करण्यात आलं आहे. या पदावर प्रथम आयपीएस देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे देवेन भारती हे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त ठरले आहेत. 

 मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्तांकडे किती अधिकार आहेत, याबद्दल माहिती समोर आली नाही मुंबई विशेष आयुक्ताच्या कार्यालयातून लवकरच याबाबत एक आदेश जारी करण्यात येऊ शकतो.

गृह विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे विभागाचे सह विशेष पोलीस आयुक्त हे विशेष पोलीस आयुक्त यांना 'रिपोर्ट' करू शकतात. सध्या आयपीएस विवेक फणसळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त आहेत. तर १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. २०१४ पासून ते २०१९ ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबईच्या सहपोलीस आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली होती

दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रमुखपदाची जबाबदारी देवेन भारती यांना दिली होती. मात्र, महाराष्ट्रात २०१९ साली उद्धव ठाकरे सरकार येताच त्यांचे अधिकार कमी करण्यात आले होते. त्यांना राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक करण्यात आले होते.दरम्यान, १३ डिसेंबर २०२२ रोजी भारती यांच्या जागी सहआयुक्त राजवर्धन यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून एटीएसचे माजी प्रमुख विनीत अग्रवाल, ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह आणि लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोचे माजी प्रमुख प्रभात कुमार हे वर्णी लागण्याच्या प्रतीक्षेत होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply