मुंबई 1992च्या दंगलीतील फरार आरोपीला 18 वर्षांनी बेड्या, ओळख लपवून मुंबईत वास्तव्य

मुंबई : मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठी दंगल म्हणून 1992 ची दंगल मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहील.या दंगलीत शेकडो निरपराध मुंबईकरांना आपले जीव गमवावे लागले होते.या दंगलीतील सहभागी मात्र मागील अठरा वर्षांपासून मोकाट फिरत होता. या फरार आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.

तबरेज अजीम खान उर्फ मन्सुरी अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपली ओळख लपवून तबरेत बिनधास्त फिरत होता. मात्र पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, 1992 च्या मुंबई दंगलीतील आरोपींवर सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले एक आरोपी मयत झाला होता.मात्र उर्वरित सहा आरोपी न्यायालयात गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने सन 2004 साली त्यांना फरारी घोषित करून त्यांचे वॉरंट जारी केले होते.

यातील आठ नंबरचा आरोपी मुंबईत आपली ओळख लपून राहत असल्याचे गुप्त बातमीदाराकडून दिंडोशी पोलिसांना समजले होते. यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपी अजीम खान उर्फ मंसूरी याला मालाड पूर्वेकडील दिंडोशी बस डेपो जवळून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यामुळे अखेर त्याला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply