मुंबई: ॲड. गुणरत्न सदावर्तेंची चौकशी करा; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात घोषणा दिल्या. याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष ॲड. निलेश भोसले यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ॲड. निलेश भोसले म्हणाले की, घरावर हल्ला म्हणजे महाराष्ट्र राज्यावर हा हल्ला आहे. पवार साहेबांना Z दर्जाची सुरक्षा असताना, हे आंदोलक साहेबांच्या घरापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने दक्षिण मुंबई सारख्या सर्वात सुरक्षित ठिकाणी पोहचतात आणि त्याची भनक CID, IB, SB-1 सारख्या यंत्रणेला लागत नाही, ही गंभीर बाब आहे असं ॲड. निलेश भोसले म्हणत त्यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

ॲड. निलेश भोसले पुढे म्हणाले की, संविधानिक मार्गाने केलेले आंदोलन असते, परंतु कट रचून केलेल्या कृतीला आतंकवादी कार्यवाही असे म्हणतात. पोलीस प्रशासनास विनंती आहे, मुंबईचा बिहार होऊ देऊ नका. ST कर्मचारी आंदोलकांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी व्हाही. कोणाच्या सांगण्याहून कायदा - सुव्यवस्था हातात घेतली जात आहे याची चौकशी होणे गरजेचं आहे असं ॲड. निलेश भोसले म्हणाले. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रमकपणा पाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सिल्व्हर ओकसमोर आले होते, त्यामुळे एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले असल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. एसटी कर्मचारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत होते. आम्हाला एसटी विलगीकरण करायचे आहे. आमची मागणी तिच असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

न्यायालयाच्या निकालानंतर आणि सरकारने केलेल्या आवाहनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अधांतरी राहिला होता. संप मागे घेण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नव्हती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचारी आंदोलन करतील, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे आक्रमक झालेले दिसले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला पवार जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply