मुंबई : ९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्टला होणार प्रसिद्ध

मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर आणि नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर २२ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या, या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी प्रारुपाच्या स्वरुपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्टपर्यंत संबंधित ठिकाणी हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply