मुंबई : विधान परिषद निवडणूकीत मतदानाची संधी मिळावी; अनिल देशमुखांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळावी यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (सोमवार) एक दिवसाच्या जातमुचलक्यावर सोडण्याची विनंती करणारा अंतरिम अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात देशमुख यांनी सकाळी ९ ते ६ या वेळेत विधानभवनात एस्कॉर्टमध्ये जाऊन मतदान करण्याची परवानगी मागितली आहे. दरम्यान न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या म्हणण्यानंतर येत्या बुधवारी देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली आहे.

गत आठवड्यातच विशेष पीएमएलए न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरती मुक्तता करण्याबाबत मागणी केली हाेती. संबंधित परवानगीचा अर्ज न्यायालयाने नाकारला हाेता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply