मुंबई – राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल; आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण

मुंबई - भाजप नेत्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

"राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल", असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप संघर्ष टोकाला गेला आहे. गेल्या 3 दिवसांपासून राणा दाम्पत्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या विषयामुळे सर्वत्र खळबळ सुरू आहे.

मात्र पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये, यासाठी राणा दांपत्याने माघार घेतली. मात्र त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांवर हल्ले देखील झाले. यानंतर भाजपचं शिष्टमंडळ तातडीने दिल्लीला रवाना होणार आहे. त्याआधीच आव्हाड यांनी हे ट्वीट केलं आहे. त्यामुळे आव्हाडांचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *