मुंबई – राणा दाम्पत्यासाठी शिवसेनेने ठेवली राखीव ॲम्ब्युलन्स; अमरावतीपर्यंत मोफत सेवा

मुंबई - शिवसेनेच्यावतीने राणा दाम्पत्यासाठी खार येथील राणा यांच्या घराबाहेर ॲम्ब्युलन्स आणली आहे. यावर 'बंटी-बबली'साठी राखीव असे बॅनर लावण्यात आले आहे. शिवसेना स्टाईल दोघानांही महाप्रसाद दिल्यास त्यांना या ॲम्ब्युलन्समधून थेट अमरावती पर्यंत मोफत सेवा देणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासाठी दोन स्ट्रेचर देखील आणले आहेत.

हनुमान चालीसा पठणावरुन राणा दाम्‍पत्‍य आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. त्यावरून मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले आहे. नवनीत राणा यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी नवनीत राणा यांची ओटी भरण्याची व्यवस्था देखील केली आहे. जर या ठिकाणी आल्या नाहीत तर ही ओटी नवनीत राणा त्यांच्या माहेरी किंवा त्यांच्या सासरी पाठवण्यात येईल असं शिवसैनिकांनी म्हंटल आहे.

राणा दाम्पत्यांना मातोश्रीकडे जाण्यापासून शिवसैनिकांनी रोखले आहे. आक्रमक शिवसैनिकांनी बॅरिकेडिंग तोडून राणांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी घरातूनच फेसबुक लाईव्ह करत शिवसेनेवर निशाणा साधला. एका आमदार आणि खासदाराला घरात बंद केले त्याचे कारण काय?, आम्हाला बंद केले पण इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक बाहेर आले त्यांना का रोखले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *