मुंबई : राणा दाम्पत्याला धक्का; FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेबरोबरच दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने राजद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणायांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याने आज तातडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. एफआयआर रद्द करण्याच्या विनंतीची फौजदारी रिट याचिका केल्यावर हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

घटना एकच असताना दोन वेगवेगळे एफआयर दाखल करण्याची गरज काय असा प्रश्न करत एकाच एफआरआयमध्ये सर्व गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत राणा दाम्पत्यांने केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य दिसतंय असे न्यायालयाने सांगितले. जर दोन्ही याचिकाकर्ता कायद्याचा आदर करणारे लोकप्रतिनीधी असतील तर त्यांनी पोलिसांना विरोध करायला नको होता असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

हा गुन्हा जाणूनबूजून दाखल करण्यात आल्याचा आरोप राणांच्या वतीने करण्यात आला. जर पहिल्या एफआयआरमध्ये जामीन मिळाला तरी दुसऱ्या एफआयआरमध्ये आम्हाला परत अटक करता यावी यासाठीच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना एकच असताना दोन वेगळ्या एफआयआर दाखल करणे चुकीचे आहे असा युक्तीवाद राणा दाम्पत्याच्या वतीने करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply