मुंबई : राऊतांनी भावनिक उत्तर न देता कायद्याने द्यावे; नोटीस पुराव्यांच्या आधारे- फडणवीस

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित ११ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. तर राऊत या कारवाईला म्हणाले होते, संपत्तीतील एकही रुपया गैरमार्गाने आला असेल तर सर्व संपत्ती भाजपला दान करणार. आता विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही या कारवाईबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई पुराव्यानिशी तसेच नोटीस देऊन झाली आहे, त्यामुळे कायद्याने उत्तर द्या असे फडणवीसांनी राऊतांना स्पष्ट सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही लोकांचा प्रयत्न असतो नख कापून शहिद होण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. त्यामुळे मला वाटत की, लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता ते असं करत आहेत. आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आत माणसं घुसवून घुसवून त्यांची मापं घेऊन घेऊन नसलेल्या नोटीशी देण्याचे काम झाले परंतु आम्ही तीच भूमिका घेतली की, आम्ही कायद्याने सर्वांचे उत्तर देऊ. त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या आधारे नोटिसेस मिळाल्या आहेत. याच कायद्यानेच त्यांनी उत्तर दिले पाहिजेत. भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

पुढे ते म्हणाले, "पत्राचाळ आहे ही गरीब मराठी माणसाचा प्रश्न होता. जो अनेक वर्ष याकरिता भिजत पडला कारण ज्यांना स्वतःला त्या लोकांचा मसीहा म्हणून घोषित केलं होत त्यांनीच त्यांचे सर्व पैसे बिल्डरच्या घश्यात घातले. जेव्हा मी मुख्यमंत्री होते तेव्हा या संदर्भसातल्या कारवाया मी केल्या. पण त्याचा वेळी आता हे पर्दाफाश होतोय कि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटायचा हा धंदा या मुंबईत कोण करतय हे आता स्पष्ट होत आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply