मुंबई : महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाचे मुंबईत पडसाद; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासलं

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता मुंबईत देखील उमटले आहेत. मुंबईत कर्नाटक सरकारच्या पोस्टरला काळं फासल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंद सिंग यांच्या पोस्टरला देखील काळ फासण्यात आले आहे. 

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संगलीमधील जत नंतर सोलापूर-अक्कलकोटवर दावा केल्यामुळे त्याचे राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील माहिम विभागातील बसस्थानकावर कर्नाटक सरकारच्या पोस्टरला काळं फासण्याचा प्रकार समोर आला आहे.

काळ फासण्यात आलेले पोस्टर हे कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचे होते. या पोस्टरवरील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंद सिंग यांच्या फोटोला देखील काळं फासण्यात आले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर वक्तव्य केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply