मुंबई:  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; भाजप नेते राज्यपालांना भेटणार

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती आहे असं मोठं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे. दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रातली कायद-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. ज्या पक्षाचं सरकार आहे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीतच कायदा हातात घेतला. काही दिवसांपूर्वी जेव्हा फडणवीसांच्या घरावर कॉंग्रेस कार्यकर्ते चाल करुन येत होते तेव्हा एक-दोन किमी आधीच त्यांना रोखण्यात आलं. मग, राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांना का जमा होऊन दिलं? मातोश्रीबाहेर का गर्दी जमा केली? तुम्ही ठरवलं असतं तर पोलिसांच्या मदतीने एका मिनीटात सगळं कंट्रोल केलं असतं. पण सरकारलाच ताकद दाखवायची होती, की आम्ही काहीही करु शकतो असं सरकारला दाखवायचं होतं असा %A



मनोरंजन

विडियो गॅलेरी