मुंबई महापालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस

मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त इकबालसिंह चहल यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. यशवंत जाधव यांच्यावरील कारवाई प्रकरणी ही नोटीस आल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं कारवाई केली होती. याबाबत चहल यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या १० मार्च २०२२ ला इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागाच्या कार्यालयात काही कागदपत्रांसह बोलावलं होतं. एप्रिल २०१८ ते मार्च २०२२ पर्यंतमुंबई महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केलेले कंत्राट, बैठकीचा आढावा आणि कंत्राटदारांची माहिती हे सर्व कागदपत्र घेऊन त्यांना बोलावलं होतं. त्याला चहल यांनी उत्तर दिलं होतं, अशी सूत्रांची माहिती आहे. आता याप्रकरणी पुन्हा त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. आयकर विभागाची महापालिकेतील कामांवर नजर असून त्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. यशवंत जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मंजूर झालेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळेच ही सर्व माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply