मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये पुन्हा 18% टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

मावळ: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये पुन्हा 18% टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून येत्या एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक तीन वर्षांनी ही दरवाढ ठरलेली आहे. या आधी एक एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती.

2030 पर्यंत प्रत्येक तीन वर्षाला ही दरवाढ करण्याचं अध्यादेशात ठरलेलं आहे. त्यानुसार एक एप्रिल 2023 पासून टोलचे नवे दर लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी चारचाकी वाहनाना 270 रुपये टोल आकारण्यात येत आहे आगामी काळात हाच टोल 320 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

दरम्यान, एकीकडे या एक्सप्रेस वेवर वाहनकोंडीमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. अशातच सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावली जाणार आहे. त्यामुळे केवळ टोलवाढ करण्याकडे लक्ष न देता वाहतूक कोंडी आणि अपघात झाल्यानंतर तत्काळ करण्यात येणाऱ्या उपाय योजनांवरती देखील लक्ष देण्याची मागणी वाहनधारक करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply