मुंबई: दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 6 मेपर्यंत वाढ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. ईडीच्या कारवाईविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी ताताडीचा दिलासा नाकारल्याच्या निर्णयाला नवाब मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत तातडीच्या सुटकेची मागणी केली होती. मलिकांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. नवाब मलिकांच्यावतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

मात्र, 'याप्रकरणी तपास अद्याप सुरू असल्याने तूर्तास यात सध्या हस्तक्षेप करू इच्छित नाही, तुम्ही नियमित कोर्टात रितसर जामीनासाठी अर्ज करू शकता, असे स्पष्ट करत ही याचिका ऐकण्यासच नकार देत ती फेटाळून लावण्यात आली आहे. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करत पुढील सुनावणी ६ मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मागील महिन्यात १५ मार्च दिवशी मुंबई हायकोर्टाने देखील नवाब मलिकांची (Nawab Malik) ही याचिका फेटाळून लावली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी दिवशी ईडीने अटक केली होती. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने (ED) दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून करण्यात आली होती.

नवाब मलिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही, मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर असलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. मात्र, ही याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यानंतर मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा याचिका फेटाळून लावल्याने नवाब मलिक यांना एक मोठा झटका बसला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply