मुंबई : ठाकरेंना मोठा धक्का! सरकारमध्ये येताच फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात नवं सरकार आलं. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर आता जुन्या सरकारने घेतलेले निर्णय बदण्याची कसरत सुरू झाली आहे. सत्तास्थापन होताच, फडणवीसांनी मेट्रोचं कारशेड हे पुन्हा आरेच्या जंगलात नेण्याचा विचार केला आहे. याबाबत कोर्टात सरकाची बाजू मांडवी, अशा सूचनाही त्यांनी अॅडव्होकेट जनरल यांना दिल्याची माहिती आहे.

वृत्तानुसार, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामप्रकरणी महाराष्ट्र सरकारची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे आदेश नव्या सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता पुन्हा जागेचा वाद पेटण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात मेट्रो कार शेडवरून मोठा राजकीय वाद झाला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात आरेतच मेट्रोच्या कारशेडला परवानगी देण्यात आली. मात्र या जागेवर कारशेड बांधण्यासाठी शिवसेनेकडून मोठा विरोध झाला. परिणामी महाविकास आघाडीने फडणवीस सरकारच्या काळातील या निर्णयला स्थगिती दिली. तसेच मेट्रोचं कारशेड कांजूर मार्गला नेलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर ठाकरे यांनी आरेमध्ये कारशेड बांधण्याचा फडणवीस यांचा निर्णय रद्द केला. मुंबईतील अनेक पर्यावरणवाद्यांनी आरे येथे कारशेड बांधण्यास विरोध केला. कारण इथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार आहे आणि बिबट्या तसंच इतर प्राण्यांचं निवासस्थान आहे. कारशेडमुळे मुंबईतील मोठ्या हिरवळीचं नुकसान होईल, असा दावा करणाऱ्या पर्यावरणवाद्यांना आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दिला.

मेट्रोचं कारशेड हे आरेत नेणं ही पर्यावरणाची हानी आहे. त्यामुळे या जागेवर कारशेड बांधू नये असे म्हणत शिवसेना ही पहिल्यापासून या निर्णयाला विरोध करत आहे. या वादात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचीही भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. याशिवाय पर्यावरण प्रेमींनीही महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. दरम्यान आता पुन्हा कारशेड हे आरेत गेल्यास हा वाद पुन्हा भडकण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसातच हेही चित्र स्पष्ट होईल.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply