मुंबई : ‘जॉन्सन’च्या बेबी टाल्कम पावडरच्या नमुन्यांची फेरतपासणी करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : जॉन्सन बेबी टाल्कम पावडर या लोकप्रिय बालप्रसाधनाच्या आणखी एका संचाच्या नमुन्यांची सरकारी प्रयोगशाळेत पुनर्तपासणी करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला सांगितले. त्यासाठी सरकारी किंवा सरकारमान्य प्रयोगशाळांची यादी १६ डिसेंबपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले. बेबी टाल्कम पावडर या उत्पादनात प्रमाणाबाहेर असलेले जिवाणू कमी करण्यासाठी आरोग्यास हानीकारक अशी र्निजतुकीकरण प्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून सर्व प्रसाधनांचा उत्पादन परवाना रद्द केल्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निर्णयाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

बेबी टाल्कम पावडरचे आणखी काही नमुने तपासले आहेत का? अशी विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी सरकारी वकील मिलिंद मोरे यांना केली होती. तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी कंपनीची याचिका सुनावणीसाठी आली. त्या वेळी न्यायालयाने बेबी पावडरच्या नमुन्यांची सरकारने पुनर्तपासणी करण्याचे म्हटले. त्यासाठीच्या सरकारी किंवा सरकारमान्य प्रयोगशाळांची यादी सादर करण्यात आल्यावर पुनर्तपासणी कोणत्या प्रयोगशाळेत केली जावी या दृष्टीने आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याच वेळी उत्पादनाच्या निर्मितीस परवानगी दिली जाऊ शकते का? याचीही चाचपणी करण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले. मात्र उत्पादनाच्या विक्रीस तूर्त परवानगी दिली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply