मुंबई : जगभरात वाढत्या करोनाच्या धर्तीवर मंगळवारी रुग्णालयांतील आरोग्य सुविधांचा आढावा घेणार

मुंबई : चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभमीवर देशातील सर्व रुग्णालये, करोना समर्पित रुग्णालये, आरोग्य सुविधा यांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी २७ डिसेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

मायक्रोनचा नवा विषाण जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे करोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा सज्ज आहे का याची खातरजमा करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी सर्व रुग्णालये, करोना समर्पित रुग्णालये, आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आरोग्य सुविधांचा विचार करण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णालयांमधील खाटांची क्षमता, विलगीकरणासाठी उपलब्ध खाटा, प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा, जीवन रक्षक प्रणाली असलेल्या खाटा, डॉक्टर, परिचारिका, निम्न वैद्यकिय, आयुष डॉक्टर, आशा, अंगणवाडी सेविका, करोना व्यवस्थापनावर व्यावसायिक प्रशिक्षित आरोग्य सेवा, शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचारी, जीवन रक्षक प्रणाली वापरण्यासाठी प्रशिक्षित असलेले कर्मचारी यासह इतर कर्मचाऱ्यांची उपलब्धता तपासण्यात येणार आहे.

प्रगत आणि मूलभूत जीवन समर्थन रुग्णवाहिकांची उपलब्धता, इतर रुग्णवाहिकांची उपलब्धता, रुग्णवाहिका कॉल सेंटरची उपलब्धता, करोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणि क्षमता, आरटी-पीसीआर आणि आरएटी किट, चाचणी उपकरणे आणि आवश्यक औषधे, जीवन रक्षक प्रणाली आदींची उपलब्धता, पीपीई किट, एन – ९५ मुखपट्टी, प्राणवायू सिलिंडर, कॉन्सन्ट्रेटर्स, द्रवरूप वैद्यकिय प्राणवायू साठवण व्यवस्था, वैद्यकीय गॅसवाहिनी प्रणाली, टेलिमेडिसिन सेवांची उपलब्धताही यावेळी तपासण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. या मोहिमेनुसार आरोग्य सुविधांच्या तयारीच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘कोविड इंडिया पोर्टल’वर ऑनलाइन अर्ज देण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply