मुंबई – घाबरून गेलो असे समजू नका…आमच्यात जशाच तसे उत्तर देण्याची क्षमता – देवेंद्र फडणवीस

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. जमावानं त्यांच्या कारवर दगडफेक केली. त्यानंतर सोमय्या यांच्या कारची काच फुटली. ती काच सोमय्या यांच्या हनुवटीवर लागली. यात ते जखमी झाले. त्यानंतर यावर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा आहे. नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येतोय, हे किरीट सोमय्या यांनी पोलिसांना कळविले होते. हल्ला होणार, हे सुद्धा त्यांनी आधीच पोलिसांना सांगितले होते. असे असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही. पोलिसांच्या मदतीने ही गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांच्या देखत शिवसैनिकांनी किरीट सोमय्या वर हल्ला केला असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ही घटना मुंबई पोलिसांची मान शरमेने खाली घालणारी आहे. पोलीस सरकारच्या दबावाखाली वागत आहे अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आता हा संपूर्ण प्रकार दिल्ली दरबारी जाणार. मी उद्या स्वतः गृहमंत्री आणि गृहसचिव यांच्याशी बोलणार आणि जे दोषी पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या घटनेने मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालविली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात कठोर कारवाईची आमची गृहमंत्री आणि गृहसचिवांकडे मागणी आहे. आम्ही घाबरून जाऊ असे समजू नका. जशाच तसे उत्तर देण्याची आमचीही क्षमता आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे असे त्ववेत देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply