मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; एकूण 37 प्रवासी जखमी

मुंबई - गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात  झाले आहेत. हे अपघात पहाटे सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहिला अपघात एका लक्झरी बसचा झाला आहे.

परळ हून खेड तालुक्यातील केळणे या गावात लग्नासाठी जात असताना या खासगी बसचा अपघात झाला आहे. ही खासगी बस भरणे गोवळवाडी या ठिकाणी महामार्गाच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटली झाली. चालकाला डुलकी लागल्याने बसवरील त्याचे नियंत्रण सुटली आणि बस रस्त्या बाहेर जाऊन उलटली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच खेडमधील मदत ग्रुप आणि रेस्क्यू टीमचे जवानी ही घटना स्थळी मदतीला दाखल झाले. सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे मुंबईहून जयगडला जाणाऱ्या तवेरा गाडीचा देखील भरणे वळंज वाडी या ठिकाणी महामार्गलगत खड्ड्यात पडून अपघात झाला आहे. या दोन्ही अपघातात एकूण 37 प्रवासी जखमी झाले आहेत. तर 15 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply