मुंबई : गृहखात्याचा अजब कारभार! अवघ्या १२ तासांत बदल्यांच्या आदेशाला स्थगिती

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलात कालच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच ५ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती  देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबईसह ठाण्यातील पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलिस आयुक्तपदी बढती दिली होती. त्याचे आदेश देखील गृहविभागाकडून काढण्यात आले होते. पण, १२ तास उलटत नाहीतर या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यानिमित्ताने गृहविभागाचा अजब कारभार समोर आला आहे.

कोणाच्या बढतीला स्थगिती? -

महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. पण, आज सकाळी त्यांच्या बढती आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्याचं कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.

कोणाला कुठे दिली होती बढती? -

  1. राजेंद्र माने हे मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त होते. त्यांची ठाण्यातील पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली होती.
  2. महेश पाटील हे मिरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयात पोलिस उपायुक्त होते. त्यांना मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.
  3. संजय जाधव हे पुणे सुरक्षा पथक महामार्गाचे पोलिस अधीक्षक होते. त्यांना ठाणे शहर अप्पर पोलिस आयुक्तपदी बदली देण्यात आली होती.
  4. पंजाबवराव उगले हे ठाण्यातील लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक होते. त्यांना मुंबईच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.
  5. दत्तात्रय शिंदे हे पालघरचे पोलिस अधीक्षक होते. मुंबई संरक्षण आणि सुरधा विभागाच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply