मुंबई : गद्दार हे गद्दार असतात, चिन्ह आणि पक्ष शिवसेनेसोबतच; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : गद्दार हे गद्दार असतात, चिन्ह आणि पक्ष शिवसेनेसोबतच आहे, उद्धव ठाकरे सोबतच आहे असं वक्तव्य युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं, ते शिवसेना भवनात बोलत होते. एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीमुळे शिवसेनेत  फुट पडली आहे. तर शिंदे गटाने मुळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह आपल्याला मिळावं अशी मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी गद्दार हे गद्दार असतात, चिन्ह आणि पक्ष शिवसेनेसोबतच आहे, उद्धव ठाकरेंसोबतच आहे असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदारांनी सेनेशी गद्दारी केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. बंडखोरांविरोधातील शिवसैनिकांच्या मनामध्ये असलेला रोष लक्षात घेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे ५० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात "निष्ठा यात्रा" काढणार आहेत.

या यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार असून या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटी , मेळावे आदित्य ठाकरे घेणार आहेत . तर मतदार संघांमधील शिवसेनेशी एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देऊन शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.

शिवाय ही यात्रा आपण शिवसैनिकांना भेटण्यासाठी काढणार असल्याचं ठाकरे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या यात्रेवेळी मुंबईतल्या शाखांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील घेण्यात येणार आहेत.

या यात्रे दरम्यान, आदित्य ठाकरे मुंबईतल्या २३६ शाखांमध्ये जाऊन गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कडवट शिवसैनिकांनी शिवसेनेबद्दल दाखवलेली आत्मीयतेबद्दल संवाद करत यात्रेला सुरवात होणार आहे .



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *