मुंबई : कोरियन तरुणीचा भररस्त्यात विनयभंग करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबईत एका कोरियन तरुणीचा दोन टवाळखोरांकडून विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. याप्रकरणी आता दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

परिमंडळ-०९ पोलीस उप-आयुक्त अनिल पारसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलीस ठाणे हद्दीत एका कोरियन महिलेसोबत घडलेल्या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या दोन्ही आरोपींविरोधात सुमोटो तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ही संतापजनक घटना उघडकीस आली. मुंबईत काही स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात एका कोरियन तरुणीची छेड काढली. बुधवारी रात्री ही संतापजनक घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. व्हिडीओ समोर येताच, मुंबईकरांनी संताप व्यक्त केला.

पीडित तरुणी ही युट्यूबर असून ती दक्षिण कोरियाची नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका तरुणाने मुंबई पोलिसांना टँग करून हा व्हिडीओ ट्विट केला होता. व्हिडीओ समोर येताच, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply