मुंबई: किरीट सोमय्यांचा CM उद्धव ठाकरेंवर पुन्हा घोटाळ्याचा आरोप

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उद्धव ठाकरे यांना थेट सवाल करत मनी लॉन्ड्रींगचा आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझी विंनती आहे. हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदींना कुठे लपवलं ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, मेहूणा श्रीधर पाटणकर यांचे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यासोबत अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आले आहेत. मी तपास यंत्रणाच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली, ते म्हणाले नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहेत. हवाला किंग एन्ट्री ऑपरेटर, ठाकरे सरकारचे पारिवारिक मित्र, बिझनेस पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहेत त्यांना फरार घोषित केलं जावं ही आमची मागणी आहे असं सोमय्या म्हणालेत.

पुढे किरीट सोमय्या म्हणाले की, ज्यांनी करोडो रुपयांच मनी लॉन्ड्रींग केलं आहे. भ्रष्टाचाराचा पैसा, माफिया सरकारनं लुटलेला पैसा पार करण्यात मदत केली. तीन डझनहून अधिक कंपन्या नंदकिशोर चतुर्वेदीने ठाकरे परिवार सारख्या अनेकांना शेयर बाजारच्या डॉग कंसेप्टचा मनी लॉन्ड्रींग करण्यासाठी उपयोग करुन दिला ते नंदकिशोर चतुर्वेदी हातात येत नाहीत असं सोमय्या म्हणाले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेंच्या तीन कंपन्यांच्या व्यवहार मी काही दिवसांपुर्वी दिला होता, त्यावर आदित्य ठाकरे काहीच बोलले नाही. मी उद्वव ठाकरेंनी विचारु इच्छितो की, श्री जी होम्स कंपनी आपल्याला माहीत आहे का? याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं श्रीधर पाटणकर हे त्याचे पार्टनर आहेत का? याच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रींग झाली आहे का ? आणि या कंपनीशी मुख्यमंत्री यांचा काय संबंध आहे? ते त्यांनी सांगावं असं त्यांनी आवाहन केलं आहे.

पुढे ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी आणि प्रवीण कलमे यांनी माझ्याविरोधात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, आता प्रवीण कलमे कुठे आहे? याचं उत्तरं मुख्यमंत्री देणार का? कलमे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलीस त्यांना शोधत असताना ते गायब आहेत. SRA च्या अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे. आता प्रवीण कलमे हे परदेशात पळाले आहेत का? त्यांना कोणी मदत केली, मुख्यमंत्री की जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच प्रवीण कलमे यांनी सरकारी कार्यालयातून कागदपत्रे चोरली आहेत याबाबत सरकारी अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केलाय. प्रवीण कलमे यांना कोण वाचवतय? अनिल परब, मुख्यमंत्री की आव्हाड असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राऊतांनी केलेल्या १०० कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यावर सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांनी न्यायालयात आणि पोलीस ठाण्यात कागदपत्रे सादर केली की मी यावर प्रतिक्रिया देईल. मी हवेत काय उत्तर देऊ ? त्यांनी कागदपत्रे सादर करावी असं सोमय्या म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply