मुंबई कशी घडली ते परदेशातून येणाऱ्यांना कळलं पाहिजे – मुख्यमंत्री

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे, किल्ले शिवनेरीची कायमस्वरुपी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचा उद्धघाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ही किल्ले शिवनेरीची कायमस्वरुपी प्रतिकृती उभारण्याच स्वप्न आता साकारलं जातय, ते देखील महाराष्ट्र दिनी ही आनंदाची बाब आहे. महाराज हे आपलं वैभव आहेत, त्यांच्या वैभवाचं दर्शन घडायला हवं. हे स्मारक नाटकातील नव्हे तर खरं वाटायला हवं होतं. आपण जसं म्हणतो की राकट देशा त्याप्रमाणे या प्रतिकृतीमधून राकटपणा दिसायला हवा होता आता तो दिसतोय. बाकी बोलायचं ते १४ तारखेला बोलेन अरविंद मला वाटल आजा मला भगवी शाल द्याल पण गरज नाही, असं म्हणत मुख्यमंंत्र्यांनी राज ठाकरे यांना टोला देखील लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply