मुंबई : एकनाथ शिंदेंची CM झाल्यानंतर उद्या पहिलीच दिल्लीवारी? PM मोदींची भेट घेण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील अनेक घडामोंडींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडामागे एका महाशक्तीचा हात असल्याचं सांगत होते. तर राज्यात सरकार स्थापन झाल्यावर विशेष अधिवेशनात भाषण करताना तर शिंदे यांनी सरकार कसं स्थापन झालं याचं गुपित देखील उलघडलं होते.

त्यामुळे या सरकारला सत्तेपर्यंत पोहचवण्यामागे भाजपचा हात असल्याच समोर आलं. तर राज्याचा कारभार हातात घेतल्यापासून मुख्यमंत्री आपल्या प्रत्येक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे आभार मानत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे हे भाजप श्रेष्ठींची भेट घेणार असून या भेटीत, ११ तारखेला सुप्रीम कोर्टात  होणाऱ्या सुनावणीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

तसंच मेट्रो कामांसाठी केंद्राचा निधी त्वरित मिळावा यासाठी मुख्यमंत्री केंद्राकडे मागणी करणार असल्याचं देखील समोर येत आहे. तर राष्ट्रपती निवडणुकीबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे यांची ही भेट अत्यंत महत्वपुर्ण ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply